शिक्षक हरिश्चंद्र साळुंखे यांनी प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती…

0
141


खोपोली- दत्तात्रय शेडगे

रायगड जिल्हा शिक्षक भारती प्राथमिक संघटनेच्या रायगड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी शिक्षक हरिश्चंद्र अर्जुन साळुंखे यांची निवड करण्यात आली.


रायगड जिल्हा शिक्षक भारती प्राथमिक संघटना यांची कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा नुकतीच चनेरा( ता रोहा ) येथे पार पडली यावेळी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

यावेळी खालापूर तालुक्यातील गावधन वाडी (चावनी) शाळेचे मुख्याध्यापक हरीचंद्र अर्जुन साळुंखे यांनी रायगड जिल्हा शिक्षक भारती प्राथमिक संघटनेच्या रायगड जिल्हा प्रसिद्धी पदावर नियुक्ती करण्यात आली, यावेळी राज्य उपाध्यक्ष विनोद कडव, राज्य प्रवर्तक सतीश हुले, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, आदीसह अनेक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.