Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी कर्जत तालुक्यांत " काॅम्प - टेक कॉम्प्युटर एज्युकेशन...

शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी कर्जत तालुक्यांत ” काॅम्प – टेक कॉम्प्युटर एज्युकेशन संस्था ” अग्रेसर !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यात कॉम्प – टेक कॉम्पुटर एज्युकेशन संस्था गेली २९ वर्षे कॉम्प्युटर शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना दर्जेदार करिअर घडविण्याचे ज्ञान देवून कार्य करत आहेत . १२ वी व १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थींनींचा सन्मान करुन त्यांना गोंधळून न जाता पुढील शिक्षण कुठले घ्यायचे ? हे करिअर गायडन्स व MKCL , KLiC ( टॅली अकाउंटिंग, ग्राफिक डिझाइन, काेडिंग, बॅंकींग, सायबर सिक्युरिटी ) इत्यादी कोर्सेस बद्दल मार्गदर्शन करून ” काॅम्प – टेक कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेने विद्यार्थ्यांना आता आपलं करिअर घडविणे फार साेपं केले आहे.
त्यातच आत्ता मुंबई सारख्या ठिकाणी कॉलेजला न जाता कर्जतमध्येच ” एज्युकेशन डिग्री ” घेवू शकता , यासाठी कर्जतमध्ये कॉम्प – टेक कॉम्पुटर एज्युकेशन मार्फत विद्यार्थी आता BBA , MBA , BCA , MCA , B. TECH , Msc Data Science , Machine Learning , MCA इन अर्टिफिशिअल इंटेलिजन्स , Bcom , Mcom , BA , MA इत्यादी शिक्षण हे देशातील टाॅप युनिवर्सिटीच्या माध्यमातून अगदी स्वस्त व एज्युकेशन लाेनच्या माध्यमातून ” Zero ” टक्के इंटरेस्ट द्वारे शिक्षण आपल्या घरी, आपल्या तालुक्यात पूर्णं करु शकतात.

” काॅम्प – टेक एज्युकेशन गेल्या ५ ते ६ वर्षापासून कर्जत तालुक्यांत तसेच रायगड जिल्ह्यात आणि इतर महाराष्ट्रातील जिल्ह्यात नामांकन मान्यताप्राप्त असलेल्या युनिवर्सिटींचे शिक्षण देत आहेत. यासाठी कॉम्प – टेक कॉम्पुटर एज्युकेशन संस्थेचे सर्वेसर्वा तथा संस्थापक श्री. जितेंद्र माळी सर् व संचालिका सौ. प्रिया माळी मॅडम सर्वतो प्रयत्न करत असून नुकतेच त्यांनी विद्यार्थ्यांचे करिअर घडण्यासाठी करिअर कोच श्री. सुरेश जाधव सर् – कल्याण यांचे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण , डिग्री , याची माहिती , नोकरी करता करता डिग्री कशी मिळवाल , एज्युकेशन लोन कसे उपलब्ध होईल , व डिग्री झाल्यावर नोकरी कशी मिळेल , मुंबईत धावपळ करून कॉलेजला न जाता कर्जतमध्ये कॉम्प – टेक कॉम्प्युटर एज्युकेशन संस्था तुम्हाला डिग्री कशी मिळवून देईल , यापूर्वी ५ वर्षे येथे शिक्षण घेवून विद्यार्थ्यांनी कश्या प्रकारे डिग्री घेवून नोकरी मिळवून दिली , याची पूर्णपणे माहिती देवून विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर केला.

शिक्षण क्षेत्रात ” शिक्षण आणि विद्यार्थी ” या दोघांचा ऋणानुबंध जुळविण्याचे महान कार्य कर्जतमध्ये श्री जितेंद्र माळी सर् ” कॉम्प – टेक कॉम्प्युटर एज्युकेशन ” संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत अविरत करत आहेत .यावेळी कर्जत तालुक्यांत १२ वी व १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थींनींचा सन्मान करुन त्यांना भेट वस्तू देवून करिअर व KLiC Courses बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page