Monday, March 4, 2024
Homeपुणेमावळशिरगांव येथील नवनिर्वाचित सरपंचाची हत्या,चार ते पाच हल्लेखोरांवर गुन्हा दाखल…

शिरगांव येथील नवनिर्वाचित सरपंचाची हत्या,चार ते पाच हल्लेखोरांवर गुन्हा दाखल…

मावळ (प्रतिनिधी):शिरगावच्या सरपंचांवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना शनिवार दि.1रोजी रात्री 10 वा.च्या दरम्यान शिरगाव चौकात घडली.यामध्ये संबंधित सरपंच गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
प्रविण साहेबराव गोपाळे (रा. शिरगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या सरपंचाचे नाव आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात चार ते पाच जणांच्या टोळक्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिरगावचे नवनिर्वाचित सरपंच प्रविण गोपाळे हे शिरगाव चौकात असताना अचानक चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. याची माहिती मिळताच शिरगाव परंदवडी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.व त्यांना पुढील उपचारार्थ पवना हॉस्पिटल,सोमाटणे येथे दाखल करण्यात आले परंतु तिथे त्यांना मयत घोषीत करण्यात आले आहे. हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून गोपाळे हे नुकतेच शिरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर विराजमान झाले होते. पुढील तपास शिरगाव-परंदवडी पोलीस करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page