भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वृध्द – महिला व रयतेला अन्न – सुरक्षा – व पालन पोषण करून स्वराज्यात खूप मोठे कार्य केले . याच माध्यमातून गेली अनेक वर्षे राजमाता जिजाऊंच्या स्फूर्तिदायक नावाने स्थापन केलेल्या ” राजमाता जिजाऊ फाऊंडेशन ” या संस्थेच्या अध्यक्षा ऍड. सौ. पूजा सुर्वे तडफेने कार्य करत असून महिलांच्या ” आधारस्तंभ ” म्हणून व ” रणरागिणी ” बनून कर्जत – खालापूर तालुक्यात नावारूपाला आल्या आहेत . यावर्षी शिवजयंतीचे औचित्य साधून त्यांनी कर्जत तालुक्यातील वांजळे येथील वृद्धाश्रमात जाऊन विसावलेल्या वृध्दांना मायेने विचारपूस करून एका मुलीच्या नात्याने फळ व बिस्कीट पुडे वाटून शिवजयंतीचे महत्व सांगून छत्रपती शिवाजी महाराज यांची आगळी वेगळी जयंती साजरी केली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला राजमाता जिजाऊ फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा ऍड. सौ. पूजा सुर्वे यांनी पुष्पहार अर्पण करून छत्रपतींचा महिमा सांगताना आपले मत व्यक्त केले की , ” शिवजयंती ” अर्थात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव . महाराष्ट्रात एखाद्या मोठ्या सणाप्रमाणे तर १११ देशात साजरा केला जातो. शुक्रवार १९ फेब्रुवारी १६६० ला पुण्यातील शिवनेरी किल्यावर शिवरायांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राष्ट्रपिता ज्योतीबा फुले यांनी १८७० साली पहिल्यांदा सार्वजनिक शिवजयंतीचा कार्यक्रम पुण्यात केला. तेव्हा पासून महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी होऊ लागली.
त्यानंतर पुढे लोकमान्य टिळकांनीही शिवजयंतीच्या माध्यमातून सार्वजनिक कार्यक्रमातून जनतेला एकत्र आणण्याचे कार्य केले. याचाच अर्थ असा की, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही या दिवसाला एक महत्त्वाचे स्थान आहे. पुढे भारतीय संविधान प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंतीच्या कार्यात मोलाचे सहकार्य केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने हिंदवी स्वराज निर्मिती , मराठा साम्राज्याचा इतिहास , महाराजांचे कार्य आणि महाराष्ट्राच्या दुर्गम किल्यांचा अभ्यास केला जातो , यावर प्रकाश टाकला.
दरवर्शी प्रमाणे आज शिवजयंती निमित्तानें ” राजमाता जिजाऊ फ़ाउंडेशन ” या सेवा भावी संस्थेच्या च्या मध्यमातुन ” Happy Flock foundation संचालित Old Age Home ” वांजळे – कर्जत येथील सर्व वृद्धांना फळे व बिस्किटे वाटून आगळी वेगळी शिवजयंती साजरी केली . याप्रसंगी राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. पूजा सुर्वे , सौ. रेखा देशमुख , सौ. पायल लांगी, सौ. मनीषा पवार , सौ.पल्लवी कनोजे , सौ. कांचन देशमुख , पंकेश जाधव , दिव्यांशु सुर्वे तसेच वृद्धाश्रमाच्या संस्थापिका देसाई मॅडम व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.