Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशिवजयंती निमित्ताने " श्री छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टँड चालक मालक संघटनेच्या...

शिवजयंती निमित्ताने ” श्री छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टँड चालक मालक संघटनेच्या ” वतीने कर्जतमध्ये महापूजेचे व भजनाचे आयोजन !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीतील रेल्वे स्थानक व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक जवळ असलेल्या ” श्री छत्रपती शिवाजी महाराज तीन आसनी रिक्षा चालक मालक स्टँड ” च्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील शिवजयंतीचे औचित्य साधून ” श्री सत्यनारायणाची महापूजेचे ” आयोजन करण्यात आले होते . यानिमित्ताने जय हनुमान भजन मंडळी – तिघर , गायिका कुमारी तेजल शंकर सकपाळ , पखवाज – गणेश हरपुडे, हरेश हजारे , तबला – राम पवार यांच्या सुमधुर भक्तिमय भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी अभिवादन करण्यासाठी आलेले शिवप्रेमी , कर्जतकर तसेच अनेक मान्यवरांनी येथे दर्शन घेवून महाप्रसादाचा लाभ घेतला . याप्रसंगी अनेकांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी जुने रेल्वे गेट डेक्कन जिमखाना येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टँडचे चालक मालक सदस्य विक्रम फाळके , सुनील जाधव , रामचंद्र भोईर , रमेश गरुड , किशोर भुंडेरे , गौरव ढोकले , मंगेश सुर्वे , बाबू सुर्वे , रवी आहेर , सतीश कोकणे , विशाल फाळके , गणेश हरपुडे , गणेश पवार , विशाल गंगावणे , जयवंत देशमुख , मुन्ना पाल , प्रवीण दीक्षित , रोहिदास घरत , दीपक जगताप , तुषार बडेकर , वासुदेव पवार , रमेश शितोळे , जगदीश माळी , नामदेव पिंगळे, महेंद्र नागरे , भूषण प्रधान , आदी रिक्षा चालक – मालक सहकुटुंब परिवारासह उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page