Sunday, April 21, 2024
Homeपुणेलोणावळाशिवदुर्ग च्या कु. तपस्या मते हिने सिंधुदुर्ग राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकाविले...

शिवदुर्ग च्या कु. तपस्या मते हिने सिंधुदुर्ग राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकाविले कांस्य पदक…

लोणावळा (प्रतिनिधी):सिंधुदुर्ग येथील आयोजित राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेस च्या कुमारी तपस्या अशोक मते हिने ऑक्झीलिअम काॅन्व्हेंट हायस्कूल चे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक मिळविले
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित 17 व 19 वर्षे वयोगटातील मुलींच्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन मामाचो गाव रिसॉर्ट, हिलोर्क ता. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे, दिनांक 11 ते 13 डिसेंबर 2022 या कालावधीत करण्यात आले होते.
या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोणावळ्यातील शिवदुर्ग फिटनेस च्या कुमारी तपस्या अशोक मते हिने ऑक्झीलिअम काॅन्व्हेंट हायस्कूल चे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक मिळविले.
तपस्या हिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोणावळ्यासह मावळ व ऑक्झीलिअम कॉन्व्हेंट हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तपस्या हिच्या उथुंग भरारीचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. तसेच हायस्कूलच्या वतीने तीचे विशेष कौतुक करण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page