![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
खोपोली- दत्तात्रय शेडगे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनांनिमताने शिवसेना शाखा आपटा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले, यात 40 युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपली आहे.सद्य राज्यात कोरोना महामारीचे मोठे संकट असून यामुळे अनेक नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.तर अनेक नागरिक हे कोरोना बाधित आहेत, यामुळे त्यांना रक्तचा तुटवडा भासत असल्याने शिवसेना शाखा आपटा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
हे शिबिर मराठी शाळा आपटा येथे पार पडले असून यात 40 युवकांनी लाभ घेतला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला माझे कुटूंब माझी जबाबदारी या संकल्पनेला प्रतिसाद देत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनांचे औचित्य साधत ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, उपतालुका प्रमुख अशोक थोरवे, कराडे ग्रामपंचायत सदस्य नितेश कारंडे, युवासेना तालुका अधिकारी विक्रांत घरत, केलवणे जिल्हा परिषद विभाग प्रमुख स्वप्नील भोवड, शाखा प्रमुख राजेंद्र घोलप, उपशाखा प्रमुख संजय आंबवणे, आपटा ग्रामपंचायत सदस्य वृषभ धुमाळ, आदी सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते