Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशिवसेना विभागप्रमुख शिवभक्त नदीमभाई खान यांच्या नेतृत्वाखाली लसीकरण शिबिर संपन्न !

शिवसेना विभागप्रमुख शिवभक्त नदीमभाई खान यांच्या नेतृत्वाखाली लसीकरण शिबिर संपन्न !

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
” शिवसेना ” या चार अक्षरात प्रचंड शक्ती आहे , तर ” शिवसेनाप्रमुख ” या सात अक्षरात सूर्याचे तेज आहे . गेली कित्तेक वर्ष आकाशात तळपणा-या या सूर्याच्या किरणांपासून सळसळत्या रक्ताचे शिवसैनिक घडवणारे ” स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ” यांच्या धगधगत्या विचारांच्या अग्निकुंडातून प्रखर ज्वालातून ध्येयवेड्या – कडवट जन्माला आलेला निखारा म्हणजेच बाळासाहेबांच्या जिवाभावाचा कट्टर शिवभक्त शाबीरभाई शेख ! मुस्लिम समाजाचे असूनही तन – मन – धन फक्त शिवसेनेला अर्पण करणाऱ्या , शिवसेनाच माझी जात , हे अखेरपर्यंत मानणाऱ्या ” स्वर्गीय शाबीरभाई शेख ” यांची प्रेरणा घेऊन त्यांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेणारे कर्जतमधील ” भगवा शिलेदार ” म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे कर्जत विभागप्रमुख नदीम युसूफ खान यांचे नाव सर्वात चर्चेत आहे.

कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे व उपजिल्हा प्रमुख भाई गायकर यांच्या मायेच्या मुशीत वाढून गरुड भरारी घेण्याची प्रेरणा आपल्या कार्यातून नेहमीच ते दाखवत असतात , आज निमित्त होते ते , कोरोना महामारीत आज पर्यंत गरीब – गरजू नागरिकांना आपल्या परीने मदतीचा हात देऊन भुकेलेल्यांना अन्न ,राशन , जीवनावश्यक वस्तू , रुग्णालयाची मदत , औषध खर्च , तातडीने एम्ब्युलन्स ,पोलिसांना सहकार्य ,पूरग्रस्तांना मदत , आरोग्य शिबीर , रक्तदान शिबिर , तर आत्ता नागरिकांना ” कवच कुंडल ” रुपी कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करून मानवी जीवनाला सहकार्य करण्याच्या स्वर्गीय शाबीरभाई शेख यांचे कार्य कर्जतमध्ये नदीमभाई युसूफ खान शिवसेनेच्या या एका पिढीकडून – पुढच्या पिढीला प्रेरणामंत्र देणारे कार्य करत आहेत.आज नुर ए ईलाही यंग कमिटी- खाटीक आळी , साई मित्र मंडळ , पाटील आळी मित्र मंडळ , धापया देवस्थान समिती , मच्छी मटण मार्केट मित्र मंडळ यांच्या मदतीने कोरोना लसीकरण संघर्ष समिती , पत्रकार कृती समिती , कर्जत नगर परिषद व उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्या वतीने शिवसेनेचे कर्जत विभागप्रमुख शिवभक्त स्वर्गीय शाबीरभाई शेख यांचे कट्टर समर्थक नदीमभाई युसूफ खान यांच्या नेतृत्वाखाली कोरोना लसीकरण शिबिर त्यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.

यावेळी अनेक नागरिकांनी लसीकरण करून सहकार्य केले .तर जे नागरिक वयोवृद्ध व बेडरेस्ट वर आहेत , त्यांना घरी जाऊन लसीकरण करण्यात आले.या लसीकरण शिबिरास रायगड उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील , वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज बनसोडे , उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , भाजप जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे , एस आर पी जिल्हाध्यक्ष व प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम भाई जाधव , नगरसेवक बळवंत घुमरे ,नगरसेवक संकेत भासे , नगरसेविका मधुरा चंदन , माजी नगरसेवक संतोष पाटील ,माजी नगरसेविका बिनीता घुमरे , महेंद्र चंदन , वंचित चे ता.अध्यक्ष धर्मेंद्र मोरे आदीनी लसीकरण शिबिरास भेट दिली.नदीम खान , लाला चौगुले , शकील शेख , रियाज मुजावर , कयूम शेख , टोनी खान , अरिफ कर्नेकर , फारूक मुल्ला , इमाम कर्नेकर , वसीम मुजावर , फरहान चौगुले , मोसिन कोतवाल , तौसिफ मोमीन , शहबाज शेख , अझर जमादार , युसुफ मुजावर , अमीर मणियार , अकिल मुल्ला , वसीम कर्नेकर , इम्रान सय्यद , शादाब शेख , इम्रान शेख , नवीद मुल्ला , आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली , तर कर्जत लसीकरण संघर्ष समिती तर्फे ऍड . कैलास मोरे, प्रशांत उगले, विनोद पांडे ,कृष्णा जाधव, शिवसेवक गुप्ता, मुद्फुल दाभिया, मन्सूर बोहरी, जयवंत म्हसे, अजय वर्धावे , निलेश हरिश्चंद्रे , सुमेश शेटे,प्रशांत सदावर्ते, आदी सदस्य उपस्थित होते .तर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.संगीता दळवी व त्यांच्या टीम ने लसीकरण करून सहकार्य केले .यावेळी पत्रकार कृती समितीचे पत्रकार उपस्थित होते . यावेळी कोव्हीशिल्ड पहिला डोस ७३ , दुसरा डोस ४७ तर कोव्याक्सीन दुसरा डोस १७ नागरिक व महिलांनी घेतले .

- Advertisment -

You cannot copy content of this page