Thursday, June 1, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडशिवसेना संपर्कप्रमुख पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रम संपन्न !

शिवसेना संपर्कप्रमुख पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रम संपन्न !

भिसेगाव -कर्जत ( सुभाष सोनावणे ) महिलांमध्ये असणारे सुप्तगुण व आजच्या या स्पर्धेच्या युगात व्यावसायिक प्रवृत्तीला वाव भेटावा , या उद्देशाने आज ” बाळासाहेबांची शिवसेना ” कर्जत – खालापूर मतदार संघाचे संपर्कप्रमुख पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या उन्नतीसाठी भव्य आणि दिव्य कार्यक्रम खांडपे येथे कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली ” आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशन ” च्या माध्यमातून संपन्न झाला . यावेळी दोन्ही तालुक्यातील अनेक महिलांनी या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनास हजेरी लावली.आज दि. ३० जानेवारी २०२३ कर्जत खालापूर विधानसभेचे संपर्क प्रमुख मा. पंकज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्जत – खालापूरचे लाडके कार्यसम्राट आमदार मा.महेंद्रशेठ थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली महिला व्यावसायिक प्रशिक्षण शिबीर , प्रदर्शन – विक्री तसेच हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला कर्जत – खालापूर मधील महिलांनी जोरदार व प्रचंड मोठ्या संख्येने भाग घेतला होता .अनेक बचत गटातून ७० हुन अधिक स्टोल व ४००० पेक्षा जास्त महिलांनी यात समाविष्ट होऊन यात खाद्य पदार्थ , सौन्दर्य प्रसाधने , हस्तकला , मसाल्याचे पदार्थ , कपडे साड्या , व इतर अनेक प्रकारच्या त्यांच्या हस्त वस्तू उत्पादनांचे प्रदर्शन मांडले होते.चूल व मूल वगळता स्त्रिया कश्या प्रकारे व्यावसायिक दृष्ट्या देखील समाजात अग्रेसर रित्या प्रगत आहेत याचे दर्शन या माध्यमातून समाजाच्या पुढे आले , असे गौरवोद्गार आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी काढले . ” आमदार महेंद्रशेठ थोरवे फौंडेशन ” द्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . अनेक विविध प्रकारचे उपक्रम या कार्यक्रमात राबवण्यात आले .

महिलांचा उत्साह अजून द्विगुणित व्हावा यासाठी ” लकी ड्रॉ ” च्या कार्यक्रमातून पैठणी वाटपाचा कार्यक्रम देखील पार पडला. संपर्कप्रमुख पंकज पाटील यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून व आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली हा आगळा वेगळा उपक्रम भव्य स्वरूपात ” न भूतो , न भविष्यती ” असा पार पडला .

You cannot copy content of this page