शिवसेना सारसई शाखेच्या नवीन उपशाखाप्रमुखपदी अनिल शिद..

0
44

खोपोली(दत्तात्रय शेडगे)
शिवसेना सारसई शाखेच्या नवीन उपशाखाप्रमुख पदी अनिल शिद यांची नुकतीच निवड करण्यात आली.पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीत ही सारसई गाव येत असून या गावात शिवसेना मोठ्या प्रमाणात विस्थापित झाली आहे.

दिवसेंदिवस शिवसेनेत अनेक तरुण वर्ग आकर्षीत होत आहे, त्याचप्रमाणे आता शिवसैनिक अनिल शिद यांची नुकतीच शिवसेना सारसई शाखेच्या उपशाखा प्रमुख पदी निवड करण्यात आली.शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली आणि शिद यांच्या निवडीचे पत्र देखील माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी सारसई शाखाप्रमुख लक्ष्मण बावदाने, सीताराम कुऱ्हाडे, चंद्रकांत शिद, राजेश उघडा, अशोक उघडा, नामदेव लेंडे, भास्कर ढेबे, काशीनाथ लेंडे आदी उपस्थित होते.