Sunday, April 21, 2024
Homeपुणेलोणावळाशिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांचा लोणावळ्यात...

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांचा लोणावळ्यात सत्कार…

लोणावळा : शिवसेना उपनेते व पुणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हा संपर्कप्रमुख सचिन भाऊ आहेर यांचे महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे जिल्ह्याच्या वतीने लोणावळ्यात स्वागत करण्यात आले.


सचिन भाऊ आहेर यांची नुकतीच शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड झाली असून ते पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. नवीनच शिवसेना पुणे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदावर आल्यानंतर प्रथमच पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघाले असून ते लोणावळा मार्गी येत असल्याची माहिती मिळताच.

महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष महेश भाऊ केदारी, कामगार नेते मधुकर पवार, लोणावळा शहराध्यक्ष शांताराम कडू, युवा नेते रोहन केदारी यांनी सचिन भाऊ यांची एक्सप्रेसवेवर भेट घेत शाल व पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत पुणे जिल्ह्यात स्वागत करण्यात आले.

- Advertisment -

You cannot copy content of this page