Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशिवसेनेच्या वतीने कर्जत मुस्लिम समाज बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन !

शिवसेनेच्या वतीने कर्जत मुस्लिम समाज बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन !

मुस्लिम समाजाच्या विकास कामांसाठी सदैव पाठीशी – आमदार महेंद्र शेठ थोरवे..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत शहर मुस्लिम समाज यांच्या पवित्र रमजान महिन्याच्या रोझ्यात कठीण उपवास पकडून पावित्र्य जोपासलं जात , कुटुंबासहित इतर सर्वांचे चांगले व्हावे , सर्वांनी प्रेमाने रहावे , सर्वांत चांगली भावना जागृत व्हावी , अशी दुवा केली जाते , म्हणूनच प्रेम – बंधुता – पावित्र्य याचा हा पवित्र ” रमजान ” महिन्यात सर्व मुस्लिम बांधव कठीण उपवास धरतात , यासाठीच दरवर्षी शिवसेनेच्या माध्यमातून कर्जत येथील मशिदीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते . मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी व विकास कामांसाठी मी सदैव आपल्या पाठीशी आहे , असा शब्द त्यांनी या इफ्तार पार्टीच्या नियोजित कार्यक्रमात सर्वाँना दिला.

यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत मा. नगरसेवक संकेत भासे , शिवसेना शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , दिनेश कडू , शहर संघटक अशोक मोरे , उपशहर प्रमुख मोहन भोईर , राकेश दळवी , उपशहर संघटक – सचिन खंडागळे , उपशहर प्रमुख ओसवाल , तर आयोजन कर्ते कर्जत शहर संघटक नदीम भाई खान व मोठ्या प्रमाणात शिवसेना पदाधिकारी तसेच मशिदीचे इमाम , सैदु भाई शेख, एजाज भाई चौगुले , हमीद भाई खैराट , आरीफ भाई चौगुले , फारुख भाई मुल्ला , शकील भाई शेख , इम्रान भाई मुल्ला , ऍड. सरफराज खान , रशीद भाई मुल्ला , नवीद भाई खान , मुदसिर मोमीन , फरहान चौगुले , सफवान चौगुले , फिरोज मुल्ला , रौनक मुजावर , सुफियान जमादार , हमीद अन्सारी , तसेच बहुसंख्येने कर्जत मुस्लिम बांधव या इफ्तार पार्टीस उपस्थित होते.

यावेळी उपस्थित आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे व सर्व शिवसेना पदाधिकारी यांचे कर्जत मुस्लिम समाजाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला . यावेळी सर्व मुस्लिम बांधवांना संबोधित करताना आमदार महेंद्र शेठ थोरवे म्हणाले की , दरवर्षी येथे मशिदित इफ्तार पार्टीचे आयोजन ” शिवसेनेचा शिलेदार व माझा लहान भाऊ नदिम भाई खान ” याच्या माध्यमातून केले जाते , शहरातून त्याचे चांगले काम असून तो नेहमीच सर्वांच्या मदतीला धावणारा ” मावळा ” असून शिवसेनेची भूमिका तो मांडत असतो , त्याने केलेल्या आपल्या सर्वांच्या मागणीनुसार मुस्लिम समाज उन्नतीसाठी व विकासाची कामे दर्गाह रस्ता व सुशोभीकरण ,कब्रस्तानचे काम चांगल्याप्रकारे झाले असून शनी मंदिर ते पुढे रस्त्याचे उर्वरित काम देखील लवकरच पूर्ण होईल , असा शब्द आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिला.
खोपोलीत नमाज पढण्यास खूप गर्दी व त्रास होत असताना तेथे सुंदर वास्तू बनविण्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे , आताच नदीम ने केलेल्या मागणीनुसार कर्जत मध्ये मुस्लिम समाज हॉलसाठी जागा उपलब्ध झाल्यास लवकरच सभागृह होईल , असे ठोस आश्वासन त्यांनी या प्रसंगी देवून विकासाला प्राधान्य द्या , आपण सर्व एकत्र येवून मतभेद न करता विकासाच्या पाठीशी ठाम राहू , भविष्यात जी कामे आहेत ती केली जातीलच , असा शब्द देत रमजानच्या या पवित्र रोझा व आजच्या इफ्तार पार्टीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या , उन्हाळा असल्याने तब्येतीची काळजी घ्या ,कुटुंबाची काळजी घ्या , असा मोलाचा सल्ला देखील दिला.
- Advertisment -

You cannot copy content of this page