शिवाजी महाराज जयंती सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश…

0
82

मुंबई : – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दि.19 रोजी असलेल्या जयंती निमित्ताने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौड मध्ये 200 जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता 500 जणांना उपस्थित राहता येईल अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली देत आरोग्य नियमांचे पालन करून , सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींच्या जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत , असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

येत्या शनिवारी दि.19 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असून त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता . त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे . त्याबाबतचे निर्देश गृह विभाग व संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत.

शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात . त्यासाठी या मुख्यत्र्यांनी दिलेल्या मान्यते नुसार शिवज्योत दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येणार तर शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.