शिव मल्हार मंडळाच्या वतीने चंपाषष्ठी उत्सवाचे आयोजन.

0
86

खोपोली-दत्तात्रय शेडगे

शिव मल्हार मंडळाच्या वतीने ओम शिव मल्हार मंदीर येथे चंपाषष्ठी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव रविवारी 20 डिसेंबर 2020 रोजी श्रीक्षेत्र पळसगाव खुर्द धनवी तालुका माणगाव जी रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे.


या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात दोन दिवस चंपाषष्ठी निमित्त मोठा उत्सव भरला जातो, मात्र या वर्षी देशावर आलेल्या कोरोना व्हायरसचे संकट असल्यामुळे हा उत्सव एकच दिवस आयोजित करण्यात आला आहे, तोही कोव्हिडं19 चे सगळे नियम पाळून हा उत्सव पार पडणार आहे.


यावेळीं सकाळी 7 वाजता श्रींचा अभिषेक ,9 वाजता ग्रंथराज शिवामहापुरण व विना पूजन, 10 वाजता हभप हरीश महाराज शेलार जोर यांचे प्रवचन, 12 वाजता महाप्रसाद,, 2 वाजता पालखी मिरवणूक, 3 वाजता सत्यनारायण महापूजा ,संध्याकाळी 7 वाजता हरिपाठ ,8 वाजता महाप्रसाद, 9 वाजता हभप रवींद्र महाराज तटकरे यांचे कीर्तन व रात्री 12 वाजता हरिजागर होणार असून सदर उत्सवा प्रसंगी कोविड19 विश्वमहामारीमुले भाविक भक्तांच्या आरोग्याच्या दृष्टीने समस्त भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी न करण्याचे आवाहन शिव मल्हार मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.