Thursday, September 28, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडशेकाप नेत्या सुप्रिया पाटील आणि चित्रलेखा पाटील यांचा वाढदिवस खोपोलीत उत्साहाने साजरा...

शेकाप नेत्या सुप्रिया पाटील आणि चित्रलेखा पाटील यांचा वाढदिवस खोपोलीत उत्साहाने साजरा…


गोरगरिबांना भाजीपाल्याचे मोफत वाटप, सलीम शेख कुटुंबीयांचा पुढाकार.

खोपोली-दत्तात्रय शेडगे

शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या तथा सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया पाटील आणि चित्रलेखा पाटील यांचा वाढदिवस खोपोलीतील सलीम शेख कुटुंबीय आणि शेकाप कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला.


२२ डिसेंबर या दिवशी रायगड जिल्ह्यातील सर्वमान्य नेत्या रायगड जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा तथा अलिबाग को ऑपरेटिव्ह बँकेच्या डायरेक्टर सुप्रिया पाटील आणि अलिबाग नगर पालिकेच्या नगरसेविका, शेकापच्या युवानेत्या चित्रलेखा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी खोपोलीतील नागरिकांना भाजी पाल्याचे वाटप सलीम शेख कुटुंबीय आणि शेकाप मित्र परिवार करत असतो.

तीच परंपरा अबाधित ठेवत यंदाही शेकडो किलो भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले आणि याचा लाभ खोपोलीतील अनेक नागरिकांनी घेतला. सुमार आर्थिक परिस्थिती असूनही सलीम शेख आणि त्यांच्या मित्र परिवाराने सुरु ठेवलेला हा उपक्रम नागरिकांच्या नेहमीच चर्चेचा असतो. नागरिकांनी सर्वांचे कौतुक केले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक निजामुद्दीन जळगावकर, सुरेश दिघे, गुरुनाथ साठेलकर, भक्ती साठेलकर आणि हुसेन शेख, हसन शेख, अभिजित तोंडे, अनिकेत मातेरे, सलमान काजी, दीपेश गायकवाड, हरीश पवार, धर्मेश, जितेश, देवा तोंडे, ऋषभ हाडप, रोहित तावडे, सुबोध, गौरव भुसारी,साहिल शेख, हर्षद गायकवाड, पवन सोमण, आबाद शेख, कुणाल डुकरे, संजय, शुभम, प्रीतम आदी उपस्थित होते.

- Advertisment -