![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा : खालापूर तालुक्यातील आजिवली गावातील हनिफअली सहाजमाल शेख उर्फ सोनू (वय ३५) या युवकाचा खून करून त्याचा मृतदेह मावळ तालुक्यातील दुधीवरे गावाजवळील जंगलात फेकल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खून व पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१६ जून रोजी हनिफअली शेख बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने वावोशी पोलिस दूरक्षेत्रात केली होती. त्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात मानवी मिसिंग म्हणून नोंद करण्यात आली. पुढील तपासात हनिफअली आपल्या ओळखीच्या शुभम राजेंद्र यादव (वय २५, रा. आपटी, ता. खालापूर), आशिष रामदास चव्हाण (वय २७, रा. डोणवत, ता. खालापूर), अमर गणपत मोरे (वय २२, रा. झाडानी, ता. खालापूर) आणि एका १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत मुळशी येथे फिरण्यासाठी गेल्याचे निष्पन्न झाले.
१७ जून रोजी सकाळच्या सुमारास मुळशीतील एका गोशाळेच्या शेडमध्ये आशिष चव्हाण व हनिफअली शेख यांच्यात वाद होऊन, त्यात लोखंडी हातोड्याने परस्परांवर मारहाण झाली. दुपारच्या सुमारास कारमध्येच चौघांनी मिळून शुभम यादवच्या टॉवेल आणि शर्टाच्या साहाय्याने हनिफअलीचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह कारमधून नेऊन मावळ तालुक्यातील दुधीवरे खिंडीत जंगलात फेकून दिला.
शुभम यादव याने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे मृतदेह जंगलात झाडीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाचे दोन्ही हात बांधलेले होते, शर्टाने गळा आवळलेला होता आणि तोंडावर टॉवेल ठेवण्यात आलेला होता. या खुनाबाबत पोलिसांनी शुभम यादव, आशिष चव्हाण, अमर मोरे आणि अल्पवयीन आरोपी या चौघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) व २०१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस व खालापूर पोलीस संयुक्तरित्या करत आहेत.