Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी भाजप किसान मोर्चाची साथ !

शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी भाजप किसान मोर्चाची साथ !

सुनील गोगटे यांच्या वतीने शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न…

भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्यातील शेतकरी हा पारंपारिक दुबार शेती करणारा शेतकरी आहे.मात्र या महागाईच्या जमान्यात फक्त शेती करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करू शकत नसल्याने शेतीबरोबरच शेती पूरक व्यवसाय केल्यास येथील शेतकरी नक्कीच आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास वेळ लागणार नाही.यासाठी लागणारे आर्थिक भांडवल शासनाकडून शेतकऱ्यास मिळाल्यास शेतक-यांची प्रगती नक्कीच होईल ,म्हणूनच भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी ठाम असून आमची साथ सदैव असेल.

असा उद्दात्य हेतू डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे यांनी कर्जत – खालापूर मतदार संघातील मार्गदर्शन शिबिरास उपस्थित शेतकऱ्यांना दिलासा देत आपले प्रांजळ मत व्यक्त केले.शेतकऱ्यांच्या प्रती त्यांचे सातत्याने प्रयत्न व मदत कार्य असल्यानेच आज दि.०५ जुलै २०२१ रोजी कोकण संघटक सुनील गोगटे यांच्या कार्यालयात या विषयांवर शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे यांच्या समवेत भाजप जिल्हा सरचिटणीस दिपक बेहेरे ,कर्जत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अशोकशेट ओसवाल , किसान मोर्चा कर्जत तालुका अध्यक्ष शिरीष कदम , तालुका सरचिटणीस संजय कराळे , विजय कुलकर्णी , मिलिंद खंडागळे , सर्वेश गोगटे , भाजपचे इतर कार्यकर्ते आणि कर्जत- खालापूर तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.शेती आणि शेती पूरक व्यवसाय आणि विविध अर्थसहाय्य , शासकीय योजना बाबत कर्जत – खालापुर तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिरात अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या समन्वयक सौ .अंजली पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की , महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य शेती पूरक व्यवसाय करण्यास होऊ शकते.

त्याकरिता लागणारी कागदपत्रे रजिस्ट्रेशन कसे करावे ह्या बाबत सविस्तर माहिती दिली.तर दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळालाच पाहिजे. तरुणांना रोजगार उभारणी साठी ह्याचा फायदा होणार आहे म्हणून तरुण शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे ,आणि आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यासाठी लागणारे सर्व सहाय्य करण्यास कटीबध्द आहोत.

म्हणून जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे यांनी केले.यावेळी अनेक शेतकऱ्यांनी त्यांना शेती करताना होणाऱ्या आर्थिक अडचणी , जोड धंद्यासाठी भांडवल आणि ईतर प्रश्न विचारले त्यावर समन्वयक अंजली पाटील यांनी योग्य मार्गदर्शन केले.शेवटी किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष शिरीष कदम यांनी मार्गदर्शक अंजली पाटील मॅडम आणि सर्व सहभागी शेतकऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

- Advertisment -

You cannot copy content of this page