Tuesday, October 3, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडशेतकरी कामगार पक्षात खोपोलित असंख्य कार्यकर्त्यांचा जाहिर प्रवेश..

शेतकरी कामगार पक्षात खोपोलित असंख्य कार्यकर्त्यांचा जाहिर प्रवेश..

आगामी काळात शेकापला अच्छे दिन येणार..

खोपोली( दत्तात्रय शेडगे)
खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रविण गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत आमदार भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत खालची खोपोली येथे कमलाबेन सभागृहात आयोजित कार्यक्रमात जाहिर पक्षप्रवेश केला आहे.

शोकापक्षाची सत्ता नसतानाही पडत्या काळात पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे आ.जयंतभाई पाटील यांनी स्वागत करीत खोपोली शहरातील लोकांनी व्यक्तिगत प्रेम केले असून दहा ते बारा वर्षापूर्वी आम्ही संघटना केले होते.त्यावेळेस आता असणारे लोक असते तर नगरपालिकेच्या निवडणुकीत चित्र बदलला असता असेही म्हणाले. 


पक्षप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा सहचिटणीस किशोरभाई पाटील,ज्येष्ठ नेते संतोष जंगम,तालुका चिटणीस संदीप पाटील,शहर चिटणीस अविनाश तावडे,नगरसेवक दिलीप जाधव, मा. उपनगराध्यक्ष अरूण पुरी,ज्येष्ठ श्याम कांबळे,कैलास गायकवाड, रविंद्र रोकडे,अँड.रामदास पाटील,मा.नगरसेवक संजय पाटील,आनंद नायडू,खजिनदार जयंत पाठक,दिनेश गुरव,राजू अभाणी,हानिफ दुदुके,मनोज माने यांच्यासह शहर कार्यकारणीतील पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page