Sunday, September 24, 2023
Homeपुणेमावळशेतकऱ्यांच्या समस्येचे कोणीही पक्षीय राजकारण करू नये, खासदार श्रीरंग बारणे...

शेतकऱ्यांच्या समस्येचे कोणीही पक्षीय राजकारण करू नये, खासदार श्रीरंग बारणे…

वाकसई : मावळ तालुक्यातील श्री एकविरा कृती समितीच्या वतीने PMRDA ने नव्याने तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्या संदर्भात वाकसई येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज पादुका स्थान येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


सदर बैठकीत खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह कार्ला परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच,कृती समिती सदस्य व बाधित शेतकरी उपस्थित होते. त्यादरम्यान बाधित गावातील प्रत्येकी एका सदस्याने आपल्या PMRDA च्या विरोधात असणाऱ्या समस्या मांडल्या तसेच यावेळी मार्गदर्शन करताना खासदार बारणे म्हणाले PMRDA ने नव्याने तयार केलेल्या प्रारूप आराखड्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनिंवर चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकले असून मी शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही.

शेतकऱ्यांच्या या समस्येमध्ये कोणीही पक्षीय राजकारण करू नये. मावळातील शेतकरी बाधित होणार नाही यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत तसेच पुढील काही दिवसात मी व आमदार सुनील शेळके आणि कृती समितीचे सदस्य PMRDA अधिकाऱ्यांसोबत बैठक लावणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

- Advertisment -