Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडशेलू येथे नागरिक व विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळण्यासाठी शिबिर संपन्न !

शेलू येथे नागरिक व विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळण्यासाठी शिबिर संपन्न !

राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका महासचिव अक्षय हिसालगे यांचा पुढाकार..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
अतिवृष्टीमुळे झालेल्या महापुरात कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायत हद्दीत अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरून अतोनात नुकसान झाले होते .घरातील किमती सामान , फर्निचर , इलेक्ट्रॉनिक वस्तू , कपडे , अन्न धान्या बरोबरच शासकीय दाखल्यांच्या कागदपत्रांची देखील खराबी झाली होती.

नागरिकांच्या या वस्तुस्थितीचा व समस्येचा कानोसा घेत नागरिकांना शासकीय कामासाठी व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दाखल्यांची गरज लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक तालुका महासचिव अक्षय हिसालगे यांनी शेलु येथे शनिवार दि.२८ ऑगस्ट २०२१ रोजी तहसील कार्यालय कर्जत यांच्या सहकार्याने शिबिर आयोजित केला होता.

राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे युवक तालुका महासचिव अक्षय सखाराम हिसालगे यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या शासकीय दाखल्यांच्या या शिबिरास परिसरातील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला.यावेळी तलाठी विकास गायकवाड, कोतवाल योगेश आखाडे, कोतवाल अशोक भगत, तसेच सेतू केंद्र कर्जत येथील मनोज भोईर, धनंजय हांडे, स्नेहल जंगम, रेणू बडेकर, यांनी दाखल्यांचे कागदपत्रे घेऊन मोलाचे सहकार्य केले .


यावेळी शेलु येथील वकील संदीप बागडे, कृष्णा बोराडे,प्रसाद मसणे, रंजित मसणे , कैलास भोईर , संदीप तरे , तुषार डुकरे ,योगेश मसणे, साई हिरेमठ ,योगेश डुकरे , तुषार मसणे , विक्रांत कुंभार , मनोज शेकटे ,शिवम धुळे, या मित्रमंडळींच्या मदतीने शेलू व जवळील परिसरातील नागरिकांचे २०० हुन अधिक दाखल्यांची कागदपत्रे जमा करून घेतले. राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे युवक तालुका महासचिव अक्षय सखाराम हिसालगे यांनी आयोजित केलेल्या या शिबिरामुळे अनेक नागरिकांचे दाखले काढण्याचे काम सोपे झाल्याने सर्वांनी अक्षय हिसालगे यांच्या कार्याचे कौतुक केले .

- Advertisment -

You cannot copy content of this page