
भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
उच्च शिक्षण घेवून भारत देशाच्या प्रशासकीय सेवेत सामील होण्याचा मान खूपच कमी विद्यार्थ्यांना मिळतो , म्हणूनच कर्जत मधील शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे व रायगड सहित कर्जत नगर परिषद हद्दीतील मुद्रे प्रभागाचे नाव रोशन करणारे प्रतिक चंद्रशेखर जुईकर यांनी खरोखरच गौरवास्पद कामगिरी करून आपल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर यूपीएससी परिक्षेत देशातून उत्तीर्ण होऊन रायगड जिल्ह्यातील पहिले IAS अधिकारी होण्याचा मान मिळविला असल्याने कर्जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत शहर कार्याध्यक्ष राजेश दादा लाड यांनी शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय उत्तुंग झेप घेणाऱ्या ” ज्ञानराजाचा ” सन्मान त्यांच्या घरी जाऊन केला.
यूपीएससी परीक्षेत देशात १७७ वा क्रमांक मिळवून अतुलनीय आणि अभिमानास्पद यश प्राप्त करणारे कर्जत व रायगड़चा अभिमान प्रतिक असे चंद्रशेखर जुईकर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील इतिहासाच्या पानावर या घटनेची सुवर्ण अक्षरात नोंद झाली असल्याचे मत कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा देताना माजी नगराध्यक्ष तथा शहर कार्याध्यक्ष राजेशदादा लाड यांनी मत व्यक्त केले.यावेळी शुभेच्छा देताना राजेशदादा लाड यांच्या समवेत सोमनाथ पालकर ,भानुदास पालकर , चंदन पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.