Monday, July 22, 2024
Homeपुणेलोणावळाशौकत भाई शेख यांचे समाजसेवेचे कार्य: बबलू गुप्ता यांच्या शस्त्रक्रियेची मोफत व्यवस्था..

शौकत भाई शेख यांचे समाजसेवेचे कार्य: बबलू गुप्ता यांच्या शस्त्रक्रियेची मोफत व्यवस्था..

लोणावळा : खंडाळ्यातील बबलू गुप्ता यांची मोफत शस्त्रक्रिया यशस्वी..

लोणावळा : खंडाळ्यातील बबलू गुप्ता (वय ४१) यांना गुडघ्याच्या त्रासामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुचवली होती, ज्याचा खर्च सुमारे २.५ लाख रुपये होता.
भाजप आमदार नितेश साहेब राणे यांच्या आशीर्वादाने, स्वाभिमान मेडिकल हेड जाहिद भाई खान यांच्या मार्गदर्शनाने, व भाजप अल्पसंख्याक अध्यक्ष मावळ तालुका शौकत भाई शेख यांच्या सहकार्यामुळे बबलू गुप्ता यांची शस्त्रक्रिया बॉम्बे हॉस्पिटल मुंबई येथे पूर्णपणे मोफत व यशस्वी करण्यात आली. शौकत भाई शेख यांच्या प्रयत्नांमुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याबद्दल गुप्ता परिवाराने त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.
शौकत भाई शेख यांचे गोरगरिबांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे येत असतो. अनेक गोरगरिबांना शौकत भाई शेख यांच्या प्रयत्नांतून स्वाभिमानी संघटना कडून मोफत शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत. त्यांच्या या सेवेचे कौतुक करणे अत्यंत आवश्यक आहे.
या प्रसंगी, शौकत भाई शेख यांनी समाजातील गरीब आणि गरजू लोकांसाठी नेहमीच तत्परतेने काम केल्याबद्दल गुप्ता परिवाराकडून विशेष आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या सेवाकार्यातून अनेकांना आरोग्यसेवा मिळवून दिल्याबद्दल शेख यांचे समाजातील योगदान उल्लेखनीय आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page