Thursday, September 12, 2024
Homeपुणेवडगावशौकत शेख यांच्या सहकार्याने आणखी एक हृदय शस्त्रक्रिया मोफत व यशस्वी…

शौकत शेख यांच्या सहकार्याने आणखी एक हृदय शस्त्रक्रिया मोफत व यशस्वी…

लोणावळा(प्रतिनिधी): भाजपा अल्पसंख्याक मावळ तालुका अध्यक्ष शौकत शेख यांच्या सहकार्याने आणखी एका गरजू रुग्णाची हार्ट ची शस्त्रक्रिया मोफत व यशस्वी रित्या पार पडली.
आमदार नितेश राणे,मेडीकल हेड जहिद खान यांच्या माध्यमातून व भाजपा अल्पसंख्यांक मावळ तालुकाध्यक्ष शौकत शेख यांच्या सहकार्याने अनेक गरजूंच्या विविध व लाखोंच्या शस्त्रक्रिया मोफत व यशस्वीरित्या पार पडल्या आहेत.
ई. वॉर्ड गावठाण लोणावळा येथील 59 वर्षीय महिला सलमा शेख यांना हृदयाचा त्रास होता व ऑपरेशनचा खर्च 2 लाख 50 हजार इतका होता.परंतु सलमा शेख यांना या ऑपरेशन चा खर्च परवडणारा नव्हता त्यावेळी शौकत शेख यांनी त्यांना सहकार्य करुन,नुकतेच भायखळा मुंबई येथील बालाजी हार्ट हॉस्पीटल येथे सलमा यांची ह्रदयाची शस्त्रक्रिया पूर्ण मोफत व यशस्वीपणे करून दिली. त्यांच्या या सहकार्याबद्दल सलमा शेख व त्यांच्या कुटुंबाकडून त्यांचे आभार मानन्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page