श्रमजीवी संघटनेच्या विरोधात तालुक्यातील आदिवासी बांधवांनाच्या वतीने खालापूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी याना निवेदन …

0
388
खालापूर-दत्तात्रय शेडगे
खालापूर तालुक्यातील कातकरी समाजातील लोकं व कार्यकर्ते आर्थिक श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून होणारी आर्थिक लूट व फसवणूकीच्या विरोधात एकजुट  झाले असून श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते  खालापूर तालुक्यातील कातकरी वाड्यांवर जाऊन खावटीच्या नावाने पावत्या फाडून पैसे उकळण्याचं कामे करीत आहेत तसेच स्थानिक शासकीय विकास कामे देखील आम्हीच केलेली आहेत असे सांगून तालुक्यातील आदिवासी बांधवाना चुकीचा प्रचार प्रसार करीत आहेत.

त्यामुळे समाज्यात गैरसमज निर्माण करून आप आपसात वाद होत आहेत त्याच अनुषंगाने  श्रमजीवी संघटनेच्या विरोधात तालुक्यातील सर्व  आदिवासी समाज च्या वतीने खालापूर  तालुक्याचे उपविभागीय अधिकारी,तालुका पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन देऊन संघटनेवर योग्य ती कार्यवाही करून आदिवासींची योजनांच्या नावावर होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावे असे निवेदन मा..विश्वास वाघ  (कातकरी विकास धोरण – अध्यक्ष  – महाराष्ट्र राज्य)  यांनी दिले.
तसेच  यापुढे जर कोणत्याही संघटनेने आदिवासींची आर्थिक पिळवणूक फसवणूक केली तर तीव्र आंदोलन  करून कायदेशीर कारवाई करण्यास शासनाला भाग पाडू, अशी प्रतिक्रिया समस्त आदिवासी बांधवांन कडुन वर्तविण्यात येत आहेत.यावेळी अनिल वाघमारे, मारुती पवार , कैलास पवार , संतोष जाधव , बबन वाघमारे , दिलीप डाकी , अंकुश वाघमारे ,- भाऊ पवार , अमित पवार, रणजीत पवार , तसेच तालुक्यातील शेकडो महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.