Monday, July 22, 2024
Homeपुणेलोणावळाश्रावणी कामत यांची पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड..

श्रावणी कामत यांची पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड..

लोणावळा : मराठी पत्रकार परिषदेच्या मुख्य विश्वस्त मा. एस. एम. देशमुख सर, विश्वस्त किरण नाईक, आणि राज्य अध्यक्ष शरद पाबळे यांच्या आदेशावरून परिषद संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या महिला जिल्हा अध्यक्ष पदी श्रावणी कामत यांची निवड करण्यात आली आहे.
आज लोणी येथे आयोजित कार्यक्रमात श्रावणी कामत यांना नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी विश्वस्त किरण नाईक सर, राज्य अध्यक्ष शरद पाबळे सर, परिषद प्रतिनिधी तात्या शेलार, सुनिल लोणकर, महिला अध्यक्षा श्रावणी कामत, विभागीय सचिव गणेश मोकाशी, मुंबई विभाग अध्यक्ष राजाभाऊ आदाटे, श्रीराम कुमठेकर, प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
- Advertisment -

You cannot copy content of this page