if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
,
खोपोली- दत्तात्रय शेडगे
दस्तूरी येथील हनुमान मंदिरात अनेक वर्षे सेवा करणारे पुजारी श्रीमंत गोविंदानंद महाराज ब्रह्मचारी यांची द्वितीय पुण्यतिथी आज हनुमान मंदिर दस्तूरी येथे साजरी करण्यात आली.
प्राचीन काळापासून मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर दस्तूरी येथे पंचमुखी हनुमान मंदिर आहे, या मंदिरात गेल्या तीस वर्षापासून पूजा ,सेवा करणारे श्रीमंत गोविंदानंद महाराज ब्रह्मचारी यांचे दोन वर्षांपूर्वी वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.
त्यांनी दस्तुरी येथील मंदिरात अनेक वर्षे सेवा केल्याने त्यांची आज या मंदिरात द्वितीय पुण्यतिथी साजरी करण्यात आली, या मंदिरात आता त्यांचे शिष्य सत्यानंद महाराज ब्रह्मचारी हे सेवा करीत आहेत, यावेळी ग्रामस्थ सत्यानंद महाराज ब्राह्मचारी, बबन शेडगे, नितीन सुतक, हरींचंद्र वाघमारे, प्रथमेश शेडगे, कृष्णा जागले, आदींसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.