Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडश्रीरामनवमी उत्सवानिम्मित भाजी व्यापारी असो .कर्जततर्फे भंडारा वाटप !

श्रीरामनवमी उत्सवानिम्मित भाजी व्यापारी असो .कर्जततर्फे भंडारा वाटप !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीतील कर्जत भाजी मार्केट असलेल्या कर्जत रेल्वे स्टेशन बाहेर सन १९८० च्या स्थापना दिनानंतर श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्याची परंपरा आजपर्यंत सुरू आहे . श्रीरामनवमी उत्सव कर्जत भाजी व्यापारी असोसिएशनने यावर्षी श्रीरामाचे पूजन करून भंडाऱ्याचे आयोजन केले होते .यावेळी या भंडारा रुपी प्रसादाचे स्टेशन परिसरातील अनेक भाविकांनी त्याचा लाभ घेतला.

कर्जत रेल्वे स्टेशन बाहेरच असलेल्या भाजी मार्केट परिसरात दरवर्षी मोठ्या उत्साहात ” श्रीरामनवमी उत्सवाचे ” औचित्य साधून श्रीसत्यनारायणाची महापूजा , श्रीराम पूजन व भंडारा रुपी प्रसादाचे आयोजन केले जात असते , मात्र कोरोना काळात हा उत्सव खंडित झाला होता म्हणूनच यावर्षी देखील मोठा उत्सव न करता फक्त श्रीरामाचे पूजन करून भंडारा वाटप करण्यात आला . यावेळी प्रथम भंडारा रुपी प्रसाद मिळण्याचा मान रानमेवा फळ विक्रेते सीमा सोमनाथ पवार यांना मिळाला , तर अनेक नागरिकांनी या प्रसादरुपी भंडाऱ्याचा लाभ घेतला.

सदरच्या उत्सवात भाजी व्यापारी असोसिएशनचे फळ विक्रेते कृपाराम लोवंशी , रानमेवा फळ विक्रेते सोमनाथ पवार , सीमा पवार , नारळपाणी विक्रेते विजू वर्मा , न्यूज पेपर विक्रेते राहुल बनकर , लस्सीवाले विजू गुप्ता , मिरची व्यापारी अशोक राठोड , पार्किंग ठेकेदार राजू मोरे , साबळे , बुर्जी पाव गाडीवाले प्राण मोरे , गणेश गुप्ता , सुभाष लोवंशी , पप्पू गुप्ता ,अरविंद लोवंशी , अमित लोवंशी , आदी सभासद यांनी मेहनत घेऊन हा श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी रेल्वे प्रवासी , कर्जतकर नागरिक , रेल्वे रिक्षा चालक मालक संघटना यांनी या भंडारा रुपी प्रसादाचा लाभ घेतला.
- Advertisment -

You cannot copy content of this page