Friday, June 14, 2024
Homeपुणेमावळश्री एकविरा विद्या मंदिर कार्ला येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्सहात संपन्न….

श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्सहात संपन्न….

कार्ला (प्रतिनिधी) : श्री एकवीरा विद्या मंदिर कार्ला विद्यालयात “वार्षिक स्नेह संमेलन” मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले .

अनेक दशकांची परंपरा असलेल्या कार्ला येथील “श्री एकवीरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स’चा वार्षिक स्नेह संमेलन व मान्यवर समारंभ उत्साहात संपन्न झाला.

समारंभाचा शुभारंभ करताना ग्रामपंचायत सदस्य दीपक हुलावळे यांच्याहस्ते शालेय ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे सदस्य शरद हुलावळे यांच्या हस्ते “विज्ञान प्रदर्शन” उद्घाटन करण्यात आले. यावेळी विध्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व प्रदर्शन सादर करत वार्षिक स्नेह संमेलन आनंदात व उत्सहात पार पडले.

यावेळी संतोष खांडगे, सर्वोच्च सदस्य सोनबा गोपाळे, सरपंच किरण हुलावळे, उपसरपंच , पोलिस पाटील संजय जाधव, ग्रा. पं. सदस्य उज्ज्वला गायकवाड, वत्सला हुलावळे, ह. भ. भ. प. अनंता महाराज, भाऊसाहेब हुलावळे, मुख्याध्यापक कैलास पारधी, शिक्षक संतोष हुलावळे, शिक्षक खूप बाबाजी हुलावळे, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page