![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
श्री एकविरा विद्यामंदिर कार्ला शाळेचा इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला आहे. कार्ला येथील नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळच्या श्री एकविरा विद्या मंदिर शाळेचा निकाल 100% लागला असून पहिले तीनही क्रमांक मुलींनीं मिळवले आहेत.
शाळेतील एकूण 67 विद्यार्थी परिक्षला बसले होते ,सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.प्रथम क्रमांक कु नेहा दत्तात्रय देवकर (91.60),द्वितीय क्रमांक कु दिया विजय येवले (88.40),तृतीय क्रमांक कु तेजल हरिश्चंद्र केदार (83.40) व अक्षदा छबु गायकवाड, (83.40)टक्के मिळवत मुलींनींच बाजी मारली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदशक शिक्षक शिक्षिका यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे,सचिव संतोष खांडगे,शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे,सरंपच रुपाली हुलावळे,उपसरपंच अविनाश हुलावळे,प्राचार्य शहाजी लाखे,वर्गअध्यापक काकासाहेब भोरे,शिक्षक प्रतिनिधी संतोष हुलावळे. यांनी अभिनंदन केले.