Saturday, July 27, 2024
Homeपुणेवडगावश्री दत्तजयंती निमित्त वडगांव शहरात आजपासून पारायण व अखंड नाम जप यज्ञ...

श्री दत्तजयंती निमित्त वडगांव शहरात आजपासून पारायण व अखंड नाम जप यज्ञ सप्ताह…

वडगांव (प्रतिनिधी): श्री दत्तजयंती उत्सव निमित्ताने वडगाव शहरात आजपासून गुरुचरित्र पारायण अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला आहे.
श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) श्री दत्त मंदिर वडगाव मावळ यांच्या वतीने वडगाव शहरात दत्त जयंती उत्सव निमित्ताने अखंड नाम जप यज्ञ गुरूचरित्र पारायण सप्ताह 1 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत दरवर्षी प्रमाणे सामूहिक गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दररोज सामूहिक गुरुचरित्र वाचन, सकाळी भूपाळी आरती, नैवेद्य आरती, औदुंबर प्रदक्षिणा, स्वामी चरित्र पाठ, नित्य स्वाहाकार, गणेश याग, श्री दत्त (स्वामी) याग, रुद्र याग, चंडी याग अशा आठ दिवस कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे.यानिमित्ताने वडगाव शहरातील श्री दत्त (स्वामी) समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
गुरूचरित्र वाचनासाठी भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील भक्तांना पारायणासाठी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या माध्यमातून श्री दत्त मंदिर परिसरात मंडप उभारण्याची उपाययोजना करण्यात आली आहे.
या सप्ताह काळात वेदतुल्य परम प्रासादिक श्रीमद् गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण व यज्ञाद्वारे विविध देवदेवतांची अतिउच्च सेवा या सप्ताह काळात सर्व सेवेकरी भाविक यांच्या उपस्थितीत दिवस-रात्र अखंड नामस्मरण करून संपन्न केली जाणार आहे. तसेच या कालावधीत विविध सेवा उपासना केल्या जाणार आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page