Friday, February 23, 2024
Homeपुणेवडगावश्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान..

श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान..

वडगांव (प्रतिनिधी):जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे वडगाव शहरातील श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडींचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे आनंदी वातावरणात प्रस्थान झाले.
प्रथमता वारकरी संप्रदायातील भाविक आणि शहरातील सर्वच राजकीय पक्षाच्या मान्यवरांनी तसेच नागरिक व महिला भगिनींनी विणापूजन करत सर्वांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. या पायी दिंडी प्रस्थान सोहळ्यानिमित्ताने शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे मान्यवर मंडळी एकत्रित सहभागी झाले होते.
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरास प्रदक्षिणा घालून टाळ-मृदंगाच्या गजरात, विठूनामाच्या जयघोषात, भगव्या पताका खांद्यावर घेतलेले वारकरी, मृदुंगमणी, टाळकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिलांनी भक्तिमय वातावरणात फुगडीचा फेर धरत दिंडीचे बाजारपेठेतून प्रस्थान झाले. यावेळी शहरातील जैन समाजाच्या वतीने पायी दिंडीवर फुलांची उधळण करत एकात्मतेचे दर्शन घडवले.
यावेळी श्री पोटोबा महाराज प्रासादिक दिंडीचे पदाधिकारी, शहरातील नागरिक व पंचक्रोशीतील भाविक, भगिनी, जैन बांधव, पत्रकार बांधव, मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका, सदस्या, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सोसायटीतील मित्रपरिवार, हितचिंतक आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, दिंडी अध्यक्ष महेंद्र ढोरे यांनी स्वागत केले तर मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी आभार व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page