कार्ला (प्रतिनिधी): संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा आळंदी येथे कार्तिकी एकादशी निमित्त पायी जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखी सोहळ्याचे कार्ला फाटा येथे स्वागत करण्यात आले.
कार्तिकी एकादशी निमित्त रायगड येथून लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होऊन शेकडो पायी दिंड्या संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींची पालखी घेऊन आळंदी येथे प्रस्थान करत असतात.
आळंदीची कार्तिकी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज 726 व्या संजीवन समाधी सोहळ्याला गुरूवार दि.17 पासून सुरूवात होत आहे . आज बुधवार दि.16 रोजी संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी पालखी सोहळ्यासाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांचे मावळ तालुक्यातील कार्ला वेहेरगाव परिसरातून कार्ला फाटा येथे भक्तिमय वातावरणामध्ये महिला मंडळी व सांप्रदायिक परिवाराच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.