Saturday, November 2, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडसंत ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव बार्डी गावात मध्ये आनंददायी वातावरण साजरा…

संत ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव बार्डी गावात मध्ये आनंददायी वातावरण साजरा…

(कर्जत प्रतिनिधी गुरुनाथ नेमाणे)

दि.14कर्जत तालुक्यातील बार्डी गावातमध्ये गेल्या दोन वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी उत्सव साजरा होते. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे कार्यक्रमाचे स्वरूप छोट्या प्रमाणात आयोजित करण्यात आले होते ह.भ.प. विजय महाराज थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव संपन्न झाला.

त्याचवेळी प्रवचनातून युवापिढीला प्रबोधनपर विचार देताना ते म्हणाले,”संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला सर्व स्तरातील समाजाला एकत्र घेऊन त्यांनी समतेची व महासुखाची वारी केली.

प्रबोधन केले,परंतु आजची युवापिढी ही संभ्रमित झालेली दिसते आहे.त्यामुळे युवापिढीने माऊलींचे विचार आत्मसात करून यश संपादन केले पाहिजे आणि आनंदी जीवन जगले पाहिजे.”कोरोनामुळे यंदा कीर्तन झाले नाही.मंदिरात पहाटे काकडा आरती,सकाळी नऊ वाजता माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करणयात आले,यावेळी संत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करणयात आले,तसेच दुपारी प्रवाचनानंतर ग्रामस्थांच्या उपस्थित सायंकाळी चार वाजता दिंडीसोहळ्याला प्रारंभ करणयात आले आणि रात्रीच्या भजनानंतर कार्यक्रमाची सांगता करणयात आली.

यावेळी ह.भ.प.मंडळी गायनाचर्य,मृदुगमणी,इत्यादी बार्डी गावातील नागरिक आणि परिसरातील ह.भ.प.मंडळी महिला वर्ग उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page