Sunday, June 23, 2024
Homeपुणेलोणावळासंदीप पाठक यांचे "वऱ्हाड निघालंय लंडनला" या नाट्याचे लोणावळ्यात लाईव्ह सादरीकरण…

संदीप पाठक यांचे “वऱ्हाड निघालंय लंडनला” या नाट्याचे लोणावळ्यात लाईव्ह सादरीकरण…

लोणावळा (प्रतिनिधी) : “वऱ्हाड निघालंय लंडनला ” या एकपात्री नाट्याचे अभिनेते संदीप पाठक यांनी लोणावळ्यात लाईव्ह सादरीकरण केले. प्रशांत दामले फॅन्स फाऊंडेशन निर्मित व प्रा. डॉ. लक्ष्मणराव देशपांडे लिखित “वऱ्हाड निघालंय लंडनला” या एकपात्री नाट्याचे लोणावळ्यातील महालक्ष्मी महिला मंचच्या सभासदांसाठी खास आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या प्रगती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या “प्रगती दिनदर्शिका 2023” याचे देखील उद्घाटन सिने अभिनेत्री किशोरी अंबिये यांच्या हस्ते करण्यात आले.

अभिनेते संदीप पाठक यांनी त्यांच्या विनोदी शैलीत सदर नाटकाचे एकपात्री सादरीकरण करत उपस्थित रसिकांना खिळवून ठेवले, नाटक पाहताना महिला अक्षरशः पोटभरून हसल्या. एका सात वर्षीय मुलीने यावेळी कचरा हा कुंडीत टाकण्याचे महत्व पटवून देताना जिमनॅस्टीक्सचे सादरीकरण केले तर दुसऱ्या मुलीने लावणी सादर केली. लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने यावेळी उपस्थित सर्वांना माझी वसुंधरा व स्वच्छतेची शपत देण्यात आली.

अभिनेता संदीप पाठक व अभिनेत्री किशोरी अंबिये यांनी लोणावळ्यात आल्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत झालेला बदल पहायला मिळत असल्याचे सांगत शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आवाहन उपस्थितांना केले. अश्विनी जाधव यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, प्रगती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा फिलोमिना कचरे, उपाध्यक्षा विजया वाळंज, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शैलजा फासे, भाजपा महिला अध्यक्षा योगिता कोकरे, माजी नगरसेविका रचना सिनकर, पार्वती रावळ यांच्यासह अनेक मान्यवर व सभासद महिला उपस्थित होत्या.

- Advertisment -

You cannot copy content of this page