संदेशला शिक्षणासाठी मदत करण्याचे वडिलांचे आवाहन..
खोपोली- दत्तात्रय शेडगे
सुधागड तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या खडई धनगर वाडा येथे राहत असलेल्या संदेश तुकाराम आवकीरकर याने 10 वि मध्ये 93.40 % गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक मिळवून सुधागड तालुक्यात पहिला येण्याचा मान मिळवला,परंतु घरची परिस्थिती अत्यंत बेताची राहायला नीट घरही नाही अश्या परिस्थिती संदेश ने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर संदेश ने आत्मोन्नती विद्यामंदिर जांभूळ पाडा या शाळेत इयता 10 वि मध्ये 93.40% गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.
संदेशची घरची परिस्थिती अत्यंत बिकट, वडील तुकाराम हे मोलमजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करून संदेश चे 10 वि पर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले परंतु आता पुढील शिक्षण घेण्याची ऐपत नसल्याने पुढील शिक्षण घ्यायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे,
संदेश ला पुढील शिक्षण घेण्याची दाट इच्छा असून परिस्थिती मुळे त्यांला शिक्षण सोडावे लागते की काय ? असा प्रश्न संदेश च्या वडिलांना पडला आहे.
दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन संदेश ला सढळ हाताने मदत करून संदेश ला पुढील शिक्षण घेण्यासाठी मदत करावी असे आवाहन वडिल तुकाराम आवकीरकर यांनी केले आहे.