मुळशी प्रतिनिधी:संपर्क संस्था इकलेर्स प्रकल्पाच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातील भांबर्डे आंबवणे कोळवन ,मुठा खोऱ्यातील व लवासा भागातील 55 जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेमध्ये एकूण 820 आदिवासी कातकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी प्रकल्प प्रमुख रोकडे कल्पेश यांनी आश्वासन दिले की आदिवासी कातकरी विद्यार्थ्यांना वर्षभर लागेल एवढे साहित्य संस्थेच्या माध्यमातून देण्यात येईल.व मागेल त्या कुटूंबाना संस्थेच्या माध्यमातून रोजगार दिला जाईल, गटविकास अधिकारी मुळशी जठार साहेब यांनी मुळशी तालुक्यामध्ये आदिवासी कातकरी विकासामध्ये संपर्क संस्थेचा मोलाचा वाटा असून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
तसेच संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र भांबर्डे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरी करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी नृत्य स्पर्धा भाषण स्पर्धा निबंध स्पर्धा असे कार्यक्रमाचे आयोजन करून आदिवासी दिनाचे महत्व पटवून दिले.
तसेच या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी गटविकास अधिकारी मुळशी तालुका जठार साहेब तसेच केंद्रप्रमुख येनपुरे सर ,अमितकुमार बॅनर्जी संस्थापक संपर्क संस्था,अनुजकुमार सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी,इकलेर्स कंपनी चे सदस्य मुंबई व पुणे ,दत्तात्रय चाळक मुख्याध्यापक संपर्क शाळा माजी जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर शंकर बत्ताले आदिवासी संघ अध्यक्ष , मुख्यध्यापक्, शिक्षकवर्ग,सरपंच ,संपर्क संस्थेचे प्रकल्प समन्वयक रोकडे कल्पेश स्वप्नील करणे रतन यादव निखिल पवार गजले परमेश्वर कपिल स्वामी संदीप कोळी संदीप भांगरे जळगाव एम एस डब्ल्यू विद्यार्थी उपस्थित होते.