Friday, July 26, 2024
Homeपुणेमावळसंपर्क हेरिटेज वॉकमध्ये सामील होण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाकडून आमंत्रण...

संपर्क हेरिटेज वॉकमध्ये सामील होण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाकडून आमंत्रण…

मावळ (प्रतिनिधी): संपर्क बालग्राम भाजे आयोजित “संपर्क हेरिटेज वॉक 2022” साठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली आणि मुंबई सर्कल अधीक्षक यांनी पाठिंबा दिला असून यामध्ये भागीदारी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
संपर्क हेरिटेज वॉक चे आयोजन 18 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आले असून या संदर्भात संपर्क हेरिटेज वॉक टीमचे अमितकुमार बॅनर्जी, तुषार दळवी आणि सतीश माळी यांच्या उपस्थितीत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली चे संचालक नवरत्न कुमार पाठक आणि मुंबई सर्कल अधीक्षक डॉ.राजेंद्र यादव यांनी भाजे लेणीच्या पायथ्याशी असलेल्या संपर्क केंद्र भाजे येथे भेट दिली.
संपर्क हेरिटेज वॉक 18 डिसेंबर 2022 रोजी आयोजित केला जाईल आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण देशाच्या अमृत महोत्सव वर्षात हेरिटेज वॉक साजरा करण्यासाठी भागीदार म्हणून सहभागी होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
तसेच डायरेक्टर नवरत्न पाठक बोलले की लेण्या आणि स्मारकांबद्दल अशा प्रकारची जागरुकता अत्यंत आवश्यक आहे, तर डॉ. यादव यांनी नमूद केले की लोहगड किल्ल्याची नोंद युनेस्को हेरिटेज यादीत करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे आणि तो युनेस्कोच्या हेरिटेज यादीत समाविष्ट होईल. भाजे लेण्यांसाठी कागदपत्रे आणि इतर प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच ए. एस. आय. च्या राष्ट्रीय अमृत मोहोत्सवाचा भाग म्हणून भाजे लेणी आणि लोहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी 18 डिसेंबर रोजी हेरिटेज वॉक साठी आमंत्रित केले आहे.
संपर्क हेरिटेज वॉक मार्फत 2016 साला पासून ऐतिहासिक भाजे लेणी, बेडसे लेणी, लोहगड आणि विसापूर किल्ला आदीचा युनेस्को यादीत समावेश करण्यासाठी जनजागृती करत आहे.या प्रकारच्या जनजागृती कार्यक्रमामुळे लेणी आणि स्मारकाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख होईल असा संदेश नवरत्न पाठक यांनी यावेळी दिला आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page