Friday, February 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" संविधान दिनी " शिवभक्त नदीम भाई खान यांची आमदार महेंद्र शेठ...

” संविधान दिनी ” शिवभक्त नदीम भाई खान यांची आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना ” भारतीय संविधानाची ” अनोखी भेट !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) नेहमीच समाजपयोगी कार्यक्रमाने कर्जतकर नागरिकांच्या मनात प्रेम व जिव्हाळा निर्माण करणारे ” शिवभक्त ” शिवसेना कर्जत शहर संघटक ” नदीम भाई खान ” आपल्या अनोख्या कार्यप्रणालीमुळे नेहमीच चर्चेत असतात . महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य व कार्याच्या विचारांच्या मुशीत वाढलेले व त्यांचे कार्य ” भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” यांनी भारतीय घटनेत साकारले असल्याने नेहमीच ” भारतीय संविधानाचा ” आदर करून महापुरुषांचे विचार घेवून समाजात वावरत असतात . ” २६ नोव्हेंबर संविधान दिन ” व नेमके याच दिवशी आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना कर्जत शहराच्या वतीने कर्जतकर नागरिकांना ” रायगड दर्शन मोहिमेचे ” आयोजन करण्यात आले होते.
रायगडावर पोहचल्यावर शिवभक्त नदीम भाई खान यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा छत्रपतींच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत येथोचित सत्कार करून ” भारतीय संविधान ” संविधान दिनाचे औचित्य साधून भेट दिली . हा दुग्धशर्करा योग शिवभक्त नदीम भाई खान यांनी घडवून आणल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नुकतीच रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना कर्जत शहर आयोजित कर्जतकर नागरिकांना ” रायगड दर्शन ” मोहीम आखली होती , आणि ती यशस्वी देखील केली . २१ बसेस मधून १००० शिवप्रेमींना घेवून रायगड दर्शन घडवायच , हि काही साधी मोहीम नव्हती , याबाबतीत शिवभक्त शिवसेना कर्जत शहर संघटक नदीम भाई खान म्हणाले की , प्रत्येक विभागातील बस ” बाळासाहेब भवन ” येथे येवून छत्रपतींना वंदन करून आम्ही निघालो . पाली येथे चहा नाश्ता झाल्यावर आम्ही रायगड भूमीच्या पायथ्याशी पोहोचलो व तेथूनच खरी मोहीम सुरू झाली . आलेल्या शिवप्रेमींमध्ये तरुण – तरुणी , महिला ,ज्येष्ठ नागरिक , विद्यार्थी असल्याने त्यांना सुखरूप नेण्याची कसोटी कर्जत शहरातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची होती . आलेल्या विभागवार शिवप्रेमींना घेवून शिवसेनेचे मावळे गड चढण्यास सुरुवात करून सर्वांना सुखरूप घेवून रायगड पावन भूमीत पोहचलो . गडाची फिरून माहिती घेतली , छत्रपतींना वंदन केले , या सर्वांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
याच दरम्यान कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि पदाधिकारी यांचे आगमन छत्रपतींच्या भूमीत झाले . यावेळी त्यांनी देखील सर्वांसोबत खाली बसून जेवण केलं . सर्व शिवप्रेमींसमोर ” शिवभक्त शहर संघटक नदीम भाई खान ” यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा शाल व संविधान दिनाचे औचित्य साधून ” भारतीय संविधान ” प्रत भेट दिले.

पुन्हा परतीच्या मोहिमेत सर्व शिवप्रेमींना सुखरूप गडावरून उतरविले , हि मोहीम खूप अवघड होती . मात्र शिवसेनेच्या कर्जत शहरातील सर्व शिलेदारांनी फत्ते करत गाडीत बसवून खात्री झाल्यावर , पुन्हा परतीच्या वाटेला लागले . सर्व गाड्या पाली येथे आल्यावर रात्रीचे जेवण करून रात्री ३ वाजता गाड्या कर्जतला पोहचल्यावर , त्या त्या प्रभागात सर्व शिवप्रेमींना घरी सुखरूप पोहचवून शिवसेनेचे शिलेदार निर्धास्त झाले व खऱ्या अर्थाने ” रायगड दर्शन मोहीम ” सुखरूप पार पडली . यांत आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना कर्जत शहर पदाधिकारी व शिवसैनिकांचा मोलाचा वाटा आहे , असा वृत्तान्त शहर संघटक नदीम भाई खान यांनी व्यक्त केला.
- Advertisment -

You cannot copy content of this page