Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" सगे सोयरे हा कायदा करा " , कर्जत सकल मराठा समाजाचे...

” सगे सोयरे हा कायदा करा ” , कर्जत सकल मराठा समाजाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना निवेदन !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) मराठा समाज आरक्षणात सगे सोयरे या जी. आर. संदर्भात चर्चा करून त्याचे कायद्यात रूपांतर व्हावे , या करिता मतदान करावे , या मागणीसाठी रायगड जिल्हा मराठा समाज समन्वयक यांचेसह कर्जत तालुक्यातील अनेक सकल मराठा बांधवांनी आज कर्जत मतदार संघाचे मान. आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी मराठा समाजाच्या मागसलेपणा सह अनेक विषयावर सकारात्मक चर्चा झाली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल ही घेतलेली शपथ पुरी करण्याच्या दृष्टीने त्यांची कार्यवाही सुरू असून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या प्रमुख मागणीसाठी दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी अधिवेशन होणार आहे.

उद्याच्या अधिवेशनात आम्ही सगेसोयरे GR पारीत होण्यासाठी नक्कीच मतदान करू , असे आश्वासन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी उपस्थित मराठा समाज बांधवांना दिले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page