लोणावळा (प्रतिनिधी): चॉकलेट देण्याच्या बहाण्याने एका 9 वर्षीय चिमुरडी वर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवार दि.25 रोजी सायंकाळी 07:15 वा.च्या सुमारास सदापुर,ता. मावळ येथे घडली आहे. या घटनेतील आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईने फिर्याद दिली असून त्यानुसार एका 35 वर्षीय व्यक्तीवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दि.25 रोजी सायंकाळी 07:15 वाजण्याच्या सुमारास सदापूर येथे आरोपीने 9 वर्षीय पीडित मुलीला चॉकलेट देण्याच्या आमिषाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे करत आहेत.