Wednesday, June 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडसनी तानाजी चव्हाण यांचा आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पक्ष प्रवेश...

सनी तानाजी चव्हाण यांचा आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पक्ष प्रवेश !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा करिष्मा दिवसेंदिवस वाढत चालला आहे , ते चौफेर फटकेबाजी करत असून आजपर्यंत अनेक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ” बाळासाहेबांची शिवसेना ” या पक्षात पक्ष प्रवेश करत आहेत . यामुळेच या पक्षाचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व या मतदार संघात आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे हात मजबूत होत आहेत.
आज शिवतिर्थ – पोसरी येथे सनी तानाजी चव्हाण यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला असल्याने कर्जत तालुक्यात अनेकांच्या भुवया वर उचलल्या गेल्या आहेत.कर्जत – खालापूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते तथा कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती तानाजीराव चव्हाण यांचे सुपुत्र सनी तानाजी चव्हाण यांनी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ” बाळासाहेबांची शिवसेना ” या पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.या त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच हादरा बसला आहे.
सनी तानाजी चव्हाण यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेशामुळे पक्षाची नक्कीच ताकद वाढली असून , भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत याचा फायदा बाळासाहेबांची शिवसेनेला होणार आहे . त्यामुळे आगामी काळात पुढे काय होणार , व राष्ट्रवादीचे अजून कोण पक्षप्रवेश करणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.या पक्ष प्रवेशावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या समवेत कर्जत तालुका संघटक संतोषशेठ भोईर , तालुका प्रमुख संभाजी जगताप , माजी उपसभापती मनोहर दादा थोरवे , सुनील ठाकूर , तसेच अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page