if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मावळ : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता राज्यसरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत सर्व गावांमध्ये आरोग्य सर्वेक्षण सुरु केले आहे. त्या अंतर्गत मावळातील अनेक गावात हे आरोग्य सर्वेक्षण राबविण्यात येत आहे.
त्याचेच औचित्य साधून कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव आप्पा वायकर यांच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण अंतर्गत मावळातील अहिरवडे,नायगाव,साते,मोहितेवाडी, वहानगाव या गावांमध्ये रोगप्रतिकारशक्ती गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
त्यावेळी अहिरवडे गावच्या सरपंच मनोरमा साळवे,साते गावचे सरपंच विठ्ठलभाऊ मोहिते,मा.उपसरपंच अनिल मोहिते,भाऊसाहेब लालगुडे,राजू लालगुडे,स्वप्नील वाडेकर,मा.सरपंच रवींद्र बोरकुले, मा.ग्रा.सदस्य दत्तात्रय भुंडे,विकास बालघरे,सुरज साळवे,नामदेव गाबने सर,सुयश सांगळे,पै सुनील दंडेल,सुजित माझिरे,ऍड. अक्षय रौधळ,नवनाथ शेळके,ग्रामसेवक अमोल कोळी,आशा सेविका वैशाली आनंदे,आरोग्य कर्मचारी लक्ष्मीकांत घोंगडे तसेच आशा सेविका ,शिक्षक,अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते.