सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरु करण्यात यावी यासाठी आर पी आय चे आकुर्डीत आंदोलन..

0
39
(मावळ प्रतिनिधी – संदीप मोरे )
पिंपरी : दि. 9.रोजी पिंपरी चिंचवड आरपीआयच्या वतीने सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे शासनाने सुरु करावीत अशी मागणी घेत आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकातील खंडोबा मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. सुरक्षेचे नियम पाळून राज्यातील मंदिरे, मस्जिद, चर्च, बुध्दविहार, गुरुद्वारा, देवसार अशी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरु करावीत या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
लॉकडाऊन मध्ये ही प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती. आता अनलॉक सुरु झाले असून कोरोना संदर्भात जनतेत प्रबोधन झाले असल्यामुळे कोरोना विषयीची खबरदारी घेत सुरक्षेचे नियम पाळून सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे शासनाने सुरु करावीत अशी मागणी करण्यात आली.
आरपीआयचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले त्यावेळी आरपीआयचे महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष खाजाभाई शेख, अल्पसंख्यांक पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शेखलाल नदाफ, युवा नेते कुणाला वाव्हळकर, दुर्गप्पा देवकर, हरी नय्यर, विनोद लाडी, शुभम शिंदे, दिनकर म्हस्के, सुजित कांबळे, विशाल कदम, शंकर इंगळे, बापू गायकवाड यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.