Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळासर्व धर्म समभावाचे प्रतीक " पवित्र रमजान ईद " निमित्ताने कुसगाव बुद्रुक...

सर्व धर्म समभावाचे प्रतीक ” पवित्र रमजान ईद ” निमित्ताने कुसगाव बुद्रुक भैरवनाथ नगर येथे शिरखुर्माचे वाटप !

अनेक हिंदू – मुस्लिम बांधवांनी घेतला शीरखुर्माचे स्वाद…

लोणावळा – ( वार्ताहर ) रमजान महिन्यातील पवित्र रोझे उपवास करून सर्वाँना सुख – शांती मिळावी , सर्वांनी एकोपा धरून प्रेमाने रहावे , अशी प्रार्थना करून सर्व धर्म समभाव असे हिंदू – मुस्लिम बांधवांच्या मैत्रीपूर्णाचे ” प्रतीक ” असलेला पवित्र सण ” रमजान ईद ” निमित्ताने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कुसगाव ( बुद्रुक ) भैरवनाथ नगर येथे मुस्लिम बांधवांनी शिरखुर्मा वाटप केले.
यावेळी या शिरखुर्माचा स्वाद बहुसंख्य मुस्लिम व हिंदू बांधवांनी घेतला .साला प्रमाणे दरवर्षी मुस्लिम बांधवांच्या पवित्र सण असलेल्या रमजान ईद निमित्ताने कुसगाव बुद्रुक भैरवनाथ नगर येथे शीरखुर्माचे वाटप करण्यात येते.
या कार्यक्रमास संपूर्ण परिसरातील हिंदू बांधून व मुस्लिम बांधव एकत्र येवून रमजान ईदच्या शुभेच्छा देवून शिरखुर्मा पितात .यावेळी या शिरखुर्मा कार्यक्रमास इम्तियाज भाई शेख , रफिक आत्तार , बिलाल सय्यद , इकबाल शेख , साद शेख , इमरान मण्यार , सलीम वडगिरी , सुलेमान वडगिरी , शाहरुख खान , रिजवान फरीद , अश्फाक शेख , मुसाफिर शेख , ओसामा शेख , सफवान सय्यद , आमीन शेख , ओवेस शेख , अन्वर शेख , दिलावर शेख , अझर पठाण , फैजान शेख , मुसेफ शेख , फरदीन शेख , वसीम बेग , हुजेफा शेख , अब्दुल सत्तार जमाल,आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते .
- Advertisment -

You cannot copy content of this page