
खोपोली (दत्तात्रय शेडगे) सहजसेवा फाउंडेशन ही आता संपुर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. तळागाळातील व विविध गरजू घटकांसाठी संपूर्ण वर्षभर संस्था कार्य करीत असते. संस्थेच्या या भरीव कार्यात समाजाचे भरीव योगदान असते. कर्जत येथील हाजी अश्रफ शहाबुद्दीन खान फौंडेशन (कर्जत) ही सुद्धा समाजाप्रती योगदान असते. संस्थेचे प्रमुख युसूफ भाई यांनी वडिलांच्या व स्व. तारलोक नागपाल,मुंबई यांच्या स्मरणार्थ दिनांक 25 एप्रिल रोजी ओम्नी गाडी सहजसेवा फाउंडेशनला जेवण वाटप,मनोरुग्ण सेवा,आपत्कालीन सेवा व इतर कार्यासाठी दिली आहे.
सहजसेवेच्या वतीने डॉ.शेखर जांभळे यांनी सन्मानिय युसुफभाई, कर्जतमधील कोंढाणा ग्रुप चे सर्वेसर्वा रमाकांतजी जाधव, सहजसेवेचे तालुकाध्यक्ष जगदीश दगडे व युसुफभाई यांचे कुटुंबीय यांच्या उपस्थितीत स्वीकारली.दिनांक 26 एप्रिल रोजी या व्हॅनचा लोकार्पण सोहळा लोहाना हॉल, खोपोली येथे पार पडला.यावेळी खोपोलीतील समाजकारणी उपस्थित होते.
ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र फक्के, विलास देशमुख,शैलेश विठ्लानी,मोहन केदार,परेश मजेठिया यांच्या पूजा करून नारळ वाढविण्यात आला. यावेळी राकेश ओसवाल,पत्रकार प्रशांत गोपाळे,रवींद्र कानिटकर,राकेश मिरवणकर,महेश काजळे,निलेश मोडवे,शरद सुरवसे,मनोज माने,बल्ली भाई तसेच सहजसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, सचिव वर्षा मोरे, उपाध्य क्षाइशिका शेलार, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,कार्यवाह बी.निरंजन,बंटी कांबळे उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या वतीने हाजी अश्रफ शहाबुद्दीन खान फाउंडेशन,कर्जतचे सामाजिक कार्यकर्ते युसुफभाई व कोंढाणा ग्रूपचे रमाकांत जाधव यांचे आभार मानण्यात आले. तसेच संस्था समाजाच्या सहकार्याने समाजाप्रती योग्य कार्यच करेल असा आशावाद श्री. राजेंद्र फक्के यांनी व्यक्त केला.