साईनाथ क्रिडा मंडळ उकरूळ तर्फे कबड्डी प्रीमियर लीग २०२२ चे आयोजन !

0
169

ओम साई संघ प्रथम विजेता…

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे )कर्जत तालुका हा मैदानी खेळ खेळण्यात चढाईवर आहे. म्हणूनच क्रिकेट खेळाबरोबरच कबड्डी या दर्जेदार खेळाकडे येथील खिलाडी वृत्तीचे तरुण आकर्षित होत असताना दिसत आहेत.आज कर्जत तालुक्यात गाव तिथे कबड्डी संघ असून या संघासाठी अनेक ठिकाणी सामने भरवुन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहेत.

कर्जत तालुक्यातील उकरूळ ग्रामपंचायत हद्दीतील उकरूळ या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत , कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त साईनाथ क्रिडा मंडळ – उकरूळ यांनी प्रीमियर लीग कब्बडी २०२२ सामन्यांचे आयोजन केले होते.या सामन्याचे उदघाटन उकरूळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ . वंदना संतोष थोरवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी उकरूळ ग्रामपंचायतीचे सर्व विद्यमान सदस्य गावचे पोलीस पाटील , गावातील सन्मानीय नागरिक , तसेच क्रिडा क्षेत्रातील तरुण उपस्थित होते.यावेळी अटीतटीच्या झालेल्या रंगतदार स्पर्धेत प्रथम क्रमांक ओम साई ५०१ ( संघमालक कु वेदांत संतोष थोरवे ) यांनी तर द्वितीय क्रमांक जय साई ( संघमालक कु स्वप्नील भालचंद्र सावंत ) यांनी पटकावला.त्यांना मानचिन्ह , व इतर रोख पारितोषिक देण्यात आले.

त्याचबरोबर इतर पारितोषिकाचे मानकरी सर्वोत्कृष्ट खेळाडू – कु शिवा खडे , उत्कृष्ट पक्कड – कु श्रीकांत मोरे , उत्कृष्ट चढाई – ऋषिकेश गोसावी व पब्लिक हिरो रुपेश बोराडे यांनी सुंदर खेळ दाखवून मानचिन्ह पटकावले.या सामन्यासाठी साईनाथ कबड्डी संघाच्या सर्व खेळाडूंनी सहकार्य करून सामन्यांचे व्यवस्थित नियोजन केले होते.या स्पर्धा बघण्यासाठी कर्जत तालुक्यासह पंचक्रोशीतील तसेच उकरूळ येथील अनेक कबड्डी शौकिनांनी हजेरी येथे लावली होती.यावेळी विजयी संघाचे अनेक राजकीय , क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.