if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
खोपोली शहरात 13 अॉगस्ट शिवसेनेची आढावा बैठक संपन्न झाली. या मेळाव्यात अनेक पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. गेली अनेक वर्षे शहरातील साईबाबा नगरचे शाखाप्रमुख पद सांभाळून एक वेगळेपण जपणारे कट्टर शिवसैनिक हमीदभाई शेख यांना बढती देण्यात आली असून त्यांना उपविभागप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
खोपोली शहरातील साईबाबा नगर या भागात राहणारे हमीदभाई शेख हे गेली पंचवीस ते तीस वर्षे शिवसेना या पक्षाचे एकनिष्ठेने काम करीत आहेत. एक कट्टर व निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे, 13 अॉगस्ट रोजी त्यांच्या कार्याला एक पोचपावती मिळाली असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते त्यांना पत्र देत उपविभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.