Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडसाजगांव औद्योगिक क्षेत्रातील प्रसोल केमिकल कंपनीत स्फोट होऊन लागली आग…

साजगांव औद्योगिक क्षेत्रातील प्रसोल केमिकल कंपनीत स्फोट होऊन लागली आग…


स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्यात यश..परिसरात भीतीचे वातावरण..

प्रतिनिधी. दत्तात्रय शेडगे.

खालापूर.साजगांव औद्योगिक क्षेत्रातील प्रसोल केमिकल कंपनीत डी ए रिकव्हरी विभागात आज संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा स्फोट घडून मोठी आग लागली.
यात केमिकल युक्त ड्रम सहित पन्नास मीटर उंच आग लागली होती.दरम्यान कंपनीतील औद्योगिक सुरक्षा यंत्रणा व आपत्कालीन व्यवस्थापन कडून तातडीने योग्य उपाययोजना केल्याने ही आग नियंत्रणात आल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे.
मात्र कंपनीतील एका उत्पादन विभागाचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र या धुराच्या लोटाने नागरिकांना दमछाक झाली होती.
- Advertisment -