साजगाव परिसरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, एका महिलेचा जागीच मृत्यू, तीन ते चार किमी पर्यंत परिसराला जोरदार बसले हादरे…
प्रतिनिधी- दत्तात्रय शेडगे
खालापूर तालुक्यातील साजगाव परिसरातील एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन आग लागल्याची घटना आज पहाटे घडली,साजगाव परिसरात ढेकू गावाजवळ असलेल्या एका केमिकल उत्पन्न करण्याच्या कंपनीत आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट होऊन मोठी आग लागल्याची घटना घडली.
यात घटनेत कंपनी शेजारी राहत असलेल्या एका कुटूंबातील महिलेचा जागीच मृत्यू झाला तर या स्फोटामुळे परिसरातील तीन ते 4 चार किमी पर्यंत घरांना जोरदार हादरे बसले आहेत, या स्फोटाचे कारण अद्याप समजले नाही.
या आगीची माहिती मिळताच खोपोली नगरपरिषद, टाटा स्टील, उत्तम स्टिल ,HPCL रिलायन्स, कर्जत नगरपरिषद यांचे अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ दाखल होत आग विझण्याचे शर्थीने पर्यन्त करीत आहेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संजय शुक्ला, खोपोली पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक अमोल वळसग, श्रीरंग किसवे, आदींसह अनेक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.