Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडसाडेपाच महिन्यांनी माथेरान पर्यटकांसाठी खुले झाल्याने स्थानिकां सह पर्यटकां मध्ये आनंदाचे वातावरण…

साडेपाच महिन्यांनी माथेरान पर्यटकांसाठी खुले झाल्याने स्थानिकां सह पर्यटकां मध्ये आनंदाचे वातावरण…

माथेरान मध्ये पहिल्याच दिवशी 21 पर्यटकांची इन्ट्री..

दत्ता शिंदे :- माथेरान

पर्यटकांचे आवडते लाडके थंड हवेचे ठिकाण माथेरान अगदी सहज पुण्या मुंबई पासून जवळचे ठिकाण असून या ठिकाणी देश विदेशातून लाखो पर्यटक माथेरानला भेट देत असतात.महाराष्ट्रचे नंदनवन तसेच रायगड ची शान अशी ओळख आहे.तसेचे कोणत्याही प्रकारच्या इंधन वाहनास बंदीअसल्याने प्रदूषण होत नाही. त्या मुळेच माथेरानला पर्यटक स्वच्छद फिरण्याचा आनंद घेत असतात.परंतु गेल्या साडेपाच महिन्या पासून माथेरान पर्यटकां साठी बंद होते.


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या साठी रायगड च्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी १७ मार्च ला माथेरानला पर्यटकांना येण्यास बंदी घातली होती.जवळ जवळ ह्या मार्च महिन्या पासून अगस्ट महिन्याच्या प्रदीर्घ कालावधी मध्ये येथील स्थानिकांची आर्थिक गणिताचे आकडे चुकले गेले.मार्च ते जुलै दरम्यान माथेरानकरांचा खरा उन्हाळी व पावसाळी पर्यटन हंगाम असतो त्याच वेळेस कोरोना सारख्या महामारीने स्थानिकांचे सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने सगळेच येथील नागरिक आर्थिक विवंचनेत पडले होते.


महाराष्ट्र शासनाच्या मिशन बिगीन अगेनच्या ३१ अगस्ट परिपत्रका नुसार जिल्हाधिकारी यांनी आदेश देण्यात आले आहेत. या प्रदिर्ध साडेपाच महिन्या नंतर माथेरान खुले झाल्याचे समजतात माथेरान मध्ये आनंदाचे वातावरण आहे.


२ सप्टेंबर रोजी माथेरान खुले करण्यात आले पहिल्याच दिवशी सकाळी २१ पर्यटकांनी तर 3 तारखेला सकाळी ८ वाजता ७ पर्यटकांनी माथेरान ला आले.येत्या शनिवार रविवार माथेरान पर्यटकांनी फुलणार हे मात्र निश्चित.बऱ्याच दिवसाच्या विश्रांती नंतर माथेरान मधील हॉटेल ,लॉज स्टॉल स्वच्छ करण्यात येत आहेत.स्वच्छ व निर्मळ गारवा अंगावर झेलण्या साठी माथेरान ला पर्यटकांची वर्दळ होणार असली तरी माथेरान मधील स्थानिक व्यवसाय करणारे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत पर्यटकांच्या स्वागता साठी सज्ज झाले आहे.

माथेरान हे पर्यटकांचे आवडते ठिकाण व मुबंई पुण्या पासून जवळचे ठिकाण असल्याने अनेक भागातून पर्यटक माथेरानला येणार मात्र माथेरान मधील स्थानिकांनी स्वतःचे आरोग्य संभाळून व्यवसाय करावा त्याच प्रमाणे शासनाने दिलेल्या अटी व नियमांचे पालन करावे…
माथेरान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत…

- Advertisment -

You cannot copy content of this page